TWJ कंपनीतील गुंतवणुकीमुळे आर्थिक फटका बसलेल्या गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. कंपनीकडून झालेल्या फसवणुकीची तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या गुंतवणूकदारांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. आक्रमक गुंतवणूकदार तातडीने कारवाईची मागणी करत असल्याने पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.