चिपळूण येथे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या कन्या मुक्ता यांच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली. अजित पवारांनी उपस्थित राहण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्या. अजितदादांनी लावलेल्या झाडांच्या छायेत सुनेत्रा पवारांचे उभे राहणे अनेकांना भावनिक करून गेले. हा क्षण निकम यांच्या प्रांगणात अनुभवला गेला.