चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एफडीवरून निशाणा साधला. 70,000 कोटी रुपये एफडीत पडून असतानाही मुंबईकर खराब रस्ते, जुने ड्रेनेज आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांशी झुंजत होते, असा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारने हेच पैसे कोस्टल रोड आणि मेट्रोसारख्या प्रकल्पांसाठी वापरून मुंबईचा कायापालट सुरू केल्याचे वाघ यांनी नमूद केले.