मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष प्रकारावर चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सकाळपर्यंत खेळणारी लहानगी गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी चांगला वकील देऊन फास्ट ट्रॅकवर केस चालवण्याची आणि दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.