भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. महानगरपालिका निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 35 वर्षांत ठाकरे बंधूंनी मुंबईची वाट लावली, अशी टीका करत त्यांनी मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी काय केले, असा सवालही उपस्थित केला.