वसई विरार शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात नाताळ सर साजरा करण्यात आला. वसई, विरार, नालासोपारा परिसरातील सर्वच चर्च मध्ये रात्री 12 वाजता मिसा पार पडला असून, आज पहाटे पासून, चर्च मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील चर्चमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना सभा, कॅरोल गायन आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश देणारे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.