वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती आयच्या कार्यालयात प्रशासकाचे आभार मानण्यासाठी भूताच्या वेषात नागरिकांनी एन्ट्री घेतली. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पालिकेकडून वसईच्या बेनापट्टी हिंदू स्मशानभूमीत चक्क ओपन जिम साहित्य आणि लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य बसवण्यात आले. त्यामुळे भुताच्या वेषात नागरिकांनी प्रशासकाचे जशास तसं पद्धतीने आभार मानले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.