राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागांत नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. हे पाणी पिण्यास आणि दैनंदिन वापरासाठी अयोग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.