संगमनेर शहरातील कुंथुनाथ सोसायटीत सकाळी 10 वाजताच्या दरम्यान बिबट्याने थेट घराच्या परिसरातील मंदिरात प्रवेश झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे.घटनेची माहिती कळताच वनविभागाने सर्च ऑपरेशन सुरु असून अद्यापपर्यंत बिबट्याचे पिल्लू अजूनपर्यंत ते सापडलेले नाही. बिबटयाचे बछडे असल्याने या परिसरात मादी बिबटा देखील असण्याची शक्यता असल्याने वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.