विराच्या सिरसाट ते वज्रेश्वरी मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळ च्या वेळेत कामावर निघालेल्या वाहनधारक वाहतूक कोंडीत अडकल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची काम सुरू आहेत. ठेकेदाराचा मनमानी, प्रशासनाचा हलगर्जी पणा यामुळे वाहनधारकांना नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.