लासलगाव शहरातील सुमननगरजवळ असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. याठिकाणी 35 ते 40 फूट कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. वाऱ्यामुळे सुका कचरा आणि बंदी असलेलं प्लास्टिक सुमननगर भागातील नागरिकांच्या घराजवळ उडून येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस पडल्यावर डम्पिंग ग्राऊंडच्या आजूबाजूच्या परिसरातून दुर्गंधी, डास, माशांचा प्रादुर्भाव यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.