रत्नागिरी जिल्ह्यात इंधन तुटवड्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. चिपळूण शहरात सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल डिझेलसह सीएनजीचा 15 जूनपर्यंत पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील ठिकाणच्या पेट्रोल पंपावर इंधन तुटवड्याची समस्या निर्माण झाली असून नागरिकांची चिंता वाढली आहे.