अंबडमध्ये सिडको परिसरात सोसायटीबाहेर तरस दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चार वाजता अंबड येथील कम्फर्ट झोन सोसायटीजवळ सोसायटीच्या बाहेरील भागात तरस फिरताना दिसून आले.