सातारा शहरातील करंजे पेठ परिसरातील एका ओढ्यात आज अचानक पिवळ्या रंगाचे दुर्मिळ बेडूक आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला विणीच्या हंगामात स्वतःचा रंग बदलणाऱ्या या 'भारतीय बुलफ्रॉग' नरांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.