घणसोली परिसरातील नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक सौरभ शिंदे यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली. मात्र, टँकरचे पाणी किती दिवस पुरणार, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी अखेर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.