सटाणा तालुक्यात मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अल्पवयीन मुलीवर अत्याचारा संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता. स्थानिक सामाजिक संघटना आणि महिला संघटनांचा या मोर्च्यात मोठा सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांनीही अत्याचाराविरोधात पुढे येत निषेध नोंदवला.पीडित कुटुंबाला तत्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.