नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने जनजीवनावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली होती, मात्र आता उष्णतेची तीव्रता वाढली असून, नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यामुळे बर्फ आणि त्यापासून तयार होणाऱ्या ज्यूसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात १८ ठिकाणी विशेष उष्माघात कक्ष उभारण्यात आले आहेत.