उल्हासनगर शहरात गेल्या 5 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. कॅम्प 5 परिसरातील रहिवासी राजाराम पवार यांनी संतापाच्या भरात अर्धनग्न होऊन बाईकवरून पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली. सध्या अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.