इराण - इस्राईल आणि अमेरिका युद्धामुळे अहिल्यानगर शहरातील 10 ते 12 नागरिक दुबईमध्ये अडकले आहेत. हे भारतीय नागरिक राहत असलेल्या हॉटेलजवळच ड्रोन हल्ला झाला होता. बुर्ज खलिफा इमारती जवळच काही भारतीय नागरिक हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्या ठिकाणी काल रात्री हल्ला झाला होता. मात्र कोणत्याही भारतीय नागरिकाला दुखापत झालेली नाही. हे नागरिक भारतीय दूतवासाच्या संपर्कात आहेत. विमानतळावर हल्ला झाल्यामुळे एअर बेस बंद आहेत. अनेक विमानांचे उड्डाणे रद्द झाले आहेत. त्यामुळे हे भारतीय नागरिक आता उड्डाणे कधी सुरू होतात याच्या प्रतीक्षेत आहेत. या अडकलेल्या पर्यटकांनी व्हिडिओद्वारे संदेश पाठवून मदतीचे आवाहन केले आहे.