नाशिक-पुणे रेल्वे मार्ग नेमका कोणत्या दिशेने जाणार, यावरून सुरू असलेल्या चर्चेत आता सिन्नरकरांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव मार्गेच जावा, या आग्रही मागणीसाठी आज १७ जानेवारी रोजी सिन्नर तहसील कचेरीसमोर भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू झाले आहे. सिन्नर आणि आसपासच्या भागातील औद्योगिक विकास आणि प्रवाशांची सोय लक्षात घेता, हा मार्ग या भागातून