सांगली जिल्ह्यातील कडेगावमधे स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी तीव्र विरोध केला. परंतु त्यास न जुमानता सुस्थितीत असलेले जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले. संतप्त नागरिकांनी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर महावितरण कार्यालयात एकच गोंधळ उडाला. बसविलेले नवीन स्मार्ट मीटर काढून आम्हाला आमचे जुने मीटर बसवून देण्यात यावे यासाठी नागरिकांनी आवाज उठवला. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोस कार्यवाही केली नाही म्हणून नागरिकांनी कडेगाव पोलीस स्टेशन गाठले.