नीट पेपर फुटी प्रकरणानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांनीही उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ भंडाऱ्यातही अस्मितेचा एल्गार संघटनेच्या वतीनं संघटनेचे प्रमुख परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शन करण्यात आली.