हिंगोलीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका पुजाऱ्यासह दोन भाविकांना नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढलं. सेनगाव तालुक्यातील बनबरडा शिवारात सरस्वती नदिला पूर आल्याने पुजाऱ्यासह दोन भाविक महादेव मंदिरात अडकले होते. ग्रामस्थांनी या तिघांनाही दोरीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढलं.