परभणी शहरात थंडीच्या मोसमात धुळीचे सर्वत्र साम्राज्य पसरले असून धुळीमुळे नागरिक बेजार झाले आहेत. सतत हवेत धूळ असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत असून हिवाळ्यात धुळीचे प्रमाण अधिकच वाढल्याने महानगरपालिकेने रस्त्यांवर पाण्याचा शिडकाव करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.