नागपूरातील बिबट सफारीमध्ये दोन बिबट्यांमध्ये झुंज झाल्याची घटना घडल्याने त्या झुंजीत एका बिबट्याचा मृत्यू तर दुसरा बिबटा गंभीर जखमी झाला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात काल दुपारी ही घटना घडली आहे. सफारी परिसरातील नियमित निरीक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना दोन बिबटे आक्रमक पद्धतीने झुंजताना आढळले. या बिबट्यांचा शोध घेणे सुरु आहे. संग्रहालयातील संचालक, क्यूरेट, पशुवैद्यकीय अधिकारी, कर्माचारी ड्रोनच्या सहाय्याने शोध घेत आहेत.