जालना जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 37 हजार 338 परीक्षार्थी ची नोंदणी झाली असून जिल्ह्यातल्या जवळपास 79 केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे, त्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात आणि पारदर्शक पार पडाव्यात यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी वेळोवेळी बैठका घेऊन तशा सूचना देखील केल्या आहेत.