नंदुरबारमध्ये उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने मातीच्या माठांची मागणी वाढली आहे. त्यातच अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर खानदेशात माठ खरेदीला विशेष महत्त्व असल्याने बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत.