द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात हवामानातील सततच्या बदलांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्या पावसाळ्यात जवळपास सहा महिने सुरू राहिलेल्या पावसानंतर तीव्र थंडीचा फटका बसला असून, सध्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा अवकाळी पावसाची शक्यतेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे हवामानातील या अनिश्चित बदलांचा थेट परिणाम द्राक्षाच्या प्रतवारीवर होत आहे उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना द्राक्षबागांवर अतिरिक्त औषधे व खते फवारावी लागत आहेत परिणामी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, सध्या मिळणाऱ्या वाढीव बाजारभावातून खर्च वसूल होणार नसल्याने या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति एकर एक लाख रुपयांची आर्थिक मदत दयावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.