जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात सर्वदूर मागील दोन दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे.काही ठिकाणी हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत आहे तर काही ठिकाणी मात्र या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दानादान उडवून प्रचंड तडाखा दिला आहे.मंठा तालुक्यातल्या टाकळखोपा,शिरपूर यासह आसपासच्या परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावालगत असलेला लघु बंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाल्याने ओसंडून वाहू लागलाय.