शहापूरच्या डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे.त्यामुळे डोळखांब बाजारपेठमध्ये पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. फळ विक्रेते तसेच छोट्या-मोठ्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.