मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचा भव्य रोड शो होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शो सुरू होईल. पोलिसांकडून सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीत उत्साह आहे.