नागपूर - मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हटलं की कडेकोट बंदोबस्त असतो. बंगल्याच्या आजूबाजूला अनेक सुरक्षारक्षक असतात. या सुरक्षारक्षकांच्या परवानगीविना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोणीही प्रवेश करू शकत नाही. विशेष म्हणजे सुरक्षेसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात स्वच्छतेचीही तेवढीच काळजी घेतली जाते. परंतु नागपुरातील मुख्यमंत्री यांचं निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर एक अजब प्रकार समोर आला आहे. या बंगल्याच्या परिसरात एक साप आढळला आहे. हा साप दिसून आल्यानंतर काही काळासाठी सर्वत्र तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आढळलेला हा साप धामण प्रजातीचा होता.