राज्यात थंडीचा कडाका वाढला असून अहिल्यानगर जिल्ह्यातही थंडीची लाट तीव्र झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली असून, ३ डिसेंबर रोजी जिल्ह्यात सर्वात कमी ९.७ अंश तापमान नोंदवले गेले.वाढत्या थंडीपासून बचावासाठी नगरकरांनी जागोजागी शेकोट्या पेटवल्या आहेत. कुटुंबातील सदस्य, विशेषतः लहान मुलांसह, शेकोटीच्या आगीची ऊब घेताना दिसत आहेत.