बुलढाणा जिल्ह्यात उत्तरेकडील वाऱ्यांमुळे गुलाबी थंडी वाढली असून, किमान तापमान २-३ अंशांनी घसरले आहे. पुढील ४-५ दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, लहान मुले व वृद्धांना आरोग्याचा धोका आहे. नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि गरज भासल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.