उत्तरेकडून वाहणार्या अतिथंड वार्यामुळे नागपूरसह विदर्भात गारठा वाढला आहे. हिवाळा जेमतेम सुरू होत असताना नागपूर शहरात आता थंडीची लाट सदृश्य स्थिती अनुभवायला मिळत आहे. दोनच दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशाने खाली घसरले असल्याने रात्री हुडहुडी भरविणारी थंडी वाढली आहे. हवामान विभागाने रविवारी नोंदविलेला पारा हा 10.8 अंश असून गोंदिया जिल्ह्यात 9.6 अंश असल्याने ,गोंदिया विदर्भात सर्वाधिक थंड शहर ठरले आहे.