थंडीमुळे एकीकडे नागरिकांचे दैनंदिन जीवन बदलले असले, तरी शेतकऱ्यांसाठी ही थंडी काही प्रमाणात लाभदायक ठरत आहे. रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असून, गहू, हरभरा आणि भाज्यांच्या पिकांसाठी ही थंडी उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. तर पपई आणि किडी पिकांना याचा फटका बसत आहे.