नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नरसी शहरात फिरून निधी जमा केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेत मदत जमा केलीय. जमा झालेला हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.