भंडारा येथील अनुराग फार्मसी कॉलेजमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या लोकार्पण सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. कार्यक्रमाला नाना पटोले, डॉ. प्रशांत पडोळे तसेच राजू कारेमोरे यांनी उपस्थिती लावली. लोकार्पणानंतर आमदार-खासदारांनी थेट बॅडमिंटन कोर्टवर उतरून खेळाचा आनंद घेतला.