वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीमध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत, सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्य सर प्रणाली अंतर्गत घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र याला नागरिकांचा प्रचंड विरोध होत आहे. हा विरोध दर्शवण्यासाठी सांगली महापालिकेतील विरोधक नगरसेवक आता एकवटले आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर टाळ वादन करत आंदोलन करण्यात आलं.