घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराविरोधात बुलढाण्यात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी तयार करत, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.