गोंदिया शहर काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्यावतीने वाढत्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ गोंदिया येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडर घेऊन केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किंमती तात्काळ कमी करण्याची मागणी केली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.