नांदेड येथील आयटीआय चौकात काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केलं. जंतर-मंतर वरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून काँग्रेसने आंदोलन केलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांकडून आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनामुळे वाहतूक कोंडी करण्यात आली.