इचलकरंजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक, गावभाग पोलीस ठाणे, लालनगर ते महासत्ता चौक या मार्गावरील सुमारे १२ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रखडलेल्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून सर्वत्र खड्डे, चिखल आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी काँग्रेसचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष साजिद मकानदार यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने चिखलातून दंडवत आंदोलन करण्यात आले