इचलकरंजी शहरातील सम्राट अशोक नगर परिसरात महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील एका घरातील नळातून दूषित, दुर्गंधीयुक्त आणि आळीसह पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.