मुंबईतील जांभळीपाडा, कालिना सांताक्रूझ पूर्व परिसरातील चाळीत गेल्या काही दिवसांपासून घाण आणि दूषित पिण्याचे पाणी येत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.