पुण्यातील कर्वेनगर परिसरात मैलामिश्रित पाणीपुरवठ्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण परिसरात घाणेरड्या पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब,उलटी,ताप,त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.