नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरती पुराचे पाणी गेले आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आहे.