नंदुरबार जिल्ह्यातून अनेक मजूर ऊस तोडणीसाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये स्थलांतर होत असतात, मात्र मुकादमांकडून मजुरांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय करण्याच्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील कोळविमाळ गावात घडली आहे. एका मजुराचं अपहरण करून त्याला साखळीने बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.