जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या अटके नंतर जालन्यात कंत्राटदारांनी जालना एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला.जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी बांधकामाचे बिल देण्यासाठी तक्रारदाराकडून 10 लाखाची लाच मागितली होती, यावेळी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केलं.या नंतर काही कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला, तसेच एसीबी अधिकाऱ्यांचे आभार मानले..