छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा भागात मनपा निवडणुकीत पैशे वाटपावरून गोंधळ उडाला आहे. पैसे वाटपासाठी करण्यात आलेली एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या प्रभागातील तरुणांनी फोटोतील फरशीवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचे घर शोधले आहे. त्या व्यक्तीला जाब विचारला सुरुवात केली असून काही तरुणांनी एकत्र येत त्या व्हायरल यादीचे बॅनर लावले आहेत. शेकडो लोकांची यादी करणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.